Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बंदुकीचा धाक दाखवून, कारसह कोट्यावधी रुपये लुटणाऱ्या चोरट्यांना अखेर अटक

बंदुकीचा धाक दाखवून, कारसह कोट्यावधी रुपये लुटणाऱ्या चोरट्यांना अखेर अटक



वर्धा : खरा पंचनामा

नागपूर - हैद्राबाद मार्गावर चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत कोट्यावधींच्या रोख रकमेसह कार पळवून नेल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मात्र याप्रकरणातील चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

बुधवारी संध्याकाळी नागपूर - हैद्राबाद मार्गावरील पोहणा शिवारात लुटीची ही घटना घडली. पीडित व्यक्ती नागपूरहून हैद्राबादच्या दिशेने कारने निघाला असताना मागून आलेल्या कारने त्याला ओव्हरटेक केले. पुढे जाऊन कार थांबवली आणि कारमधील तिघेजण खाली उतरून त्यांनी मागच्या कारमधील व्यक्तीला बंदुकीचा धाक दाखवत थांबवले. त्यांनी त्याच्याकडून साडेचार कोटी रुपयांची रोख रक्कम आणि कार दोन्ही लुटली आणि ते फरार झाले. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास सुरू करण्यात आला आणि अवघ्या काही तासांतच पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेत काही रोख रक्कम हस्तगत केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.