Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माहिती लपवल्याप्रकरणी ३८८ बिल्डरांची नोंदणी स्थगित! 'महारेरा'ची कारवाई : सांगलीतील तीन बिल्डरांचा समावेश; माकेर्टिंग, घर विक्रीवर बंदी

माहिती लपवल्याप्रकरणी ३८८ बिल्डरांची नोंदणी स्थगित!
'महारेरा'ची कारवाई : सांगलीतील तीन बिल्डरांचा समावेश; माकेर्टिंग, घर विक्रीवर बंदीमुंबई : खरा पंचनामा

ग्राहकांसाठी आवश्यक असणारी तिमाही माहिती उपलब्ध करून न दिल्याने राज्यातील ३८८ बिल्डरांची नोंदणी स्थगित करण्यात आली आहे. यामध्ये सांगलीतील तीन बिल्डरांचा समावेश आहे. कारवाई करण्यात आलेल्या सर्वच बिल्डरांना प्रकल्पाची जाहिरात, मार्केटिंग, घर विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 'महारेरा'ने ही कारवाई केली आहे. 

कारवाई करण्यात आलेल्यांची बॅंक खाती गोठवण्यात येत आहेत. शिवाय या संबंधित बिल्डरांच्या प्रकल्पांमधील घरांची विक्री, साठेखताची नोंदणी न करण्याचे निर्देश उपनिबंधकांना देण्यात आले आहे आहेत. यामध्ये मुंबई महानगरातील १२७, पश्चिम महाराष्ट्रातील १२०, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रत्येकी ५७, मराठवाड्यातील १६ आणि कोकणातील ११ प्रकल्पांचा समावेश आहे. 

'महारेरा'ने स्थावर संपदा अधिनियमानुसार गृहप्रकल्पांसंदर्भात नोंदणीसाठी केलेल्या कडक नियमानंतर ७४६ प्रकल्पांनी २० एप्रिलपर्यंत पहिल्या तीन महिन्यांतील आवश्यक माहिती नोंदवली होती. त्यात घरे, गॅरेजची नोंदणीसह किती रक्कम प्राप्त झाली, किती खर्च झाली, इमारत आराखड्यात बदल झाला असल्यास आदी बाबींची माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करणे अपेक्षित होते. 

स्थावर संपदा अधिनियमातील कलम ११ विनियमनाचे नियम ३, ४, ५, जुलै २०२२ च्या आदेशानुसार प्रत्येक विकासकास तिमाही तसेच वार्षिक विवरण प्रपत्रे संकेतस्थळावर अद्ययावत करणे बंधनकारक आहे. सुरुवातीला 'महारेरा'ने संबंधितांना गंभीर स्वरूपाच्या नोटीसा पाठवल्या. त्याला प्रतिसाद न दिल्याने ३८८ विकासकांच्या प्रकल्पांची नोंदणी स्थगित करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.