Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांविरोधात गुन्हा दाखल!

संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांविरोधात गुन्हा दाखल!



पुणे : खरा पंचनामा

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. महापुरुषांचा अपमान प्रकरणानंतर त्यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संभाजी भिडेंबरोबरच आणखी १५० जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. परवानगी नाकारल्यानंतरही पोलिसांचा आदेश धुडकावतं मार्गदर्शन बैठक घेतल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संभाजी भिडे यांना मार्गदर्शक बैठक घेण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही भिडेंनी मार्गदर्शक बैठक घेतली. त्यामुळे ही बैठक त्यांना चांगलीच महागात पडली आहे. पुण्यातील मांजरी कोलवडी परिसरात नगर रस्त्यावरील माऊली लॉन्स या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला संभाजी भिडे यांना सभेसाठी पोलसांनी परवानगी नाकारली होती.

मात्र, संभाजी भिडेंनी पोलिसांचे आदेशाकडे दूर्लक्ष करत मार्गदर्शक बैठक घेतली. त्यामुळे भिडेंसह १५० जणांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखला केला. संभाजी भिडेंबरोबरचं राजेंद्र आव्हाळे, बाळासाहेब नेवाळे, राहुल उद्रे यांच्यावर गुन्हा नोदंवला गेला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.