Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसांना धक्का देऊन बलात्कारातील आरोपी गेला पळून!

पोलिसांना धक्का देऊन बलात्कारातील आरोपी गेला पळून!



पुणे : खरा पंचनामा

बलात्काराच्या गुन्हयात अटकेत  असलेल्या आरोपी पोलिसांना धक्का देवून पळून गेला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हडपसर पोलिस ठाण्याच्या अंकित असलेल्या मगरपट्टा पोलिस चौकीत घडली.

प्रितम चंदुलाल ओसवाल (वय 32, रा. देवाची उरूळी, ता. हवेली) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हडपसर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्हयात पोलिसांनी प्रितम ओसवाल याला दि. 31 ऑगस्ट रोजी अटक केली होती. तो सध्या पोलिस कोठडीत होता. 

पोलिसांनी आरोपी प्रितम ओसवाल याला सोमवारी सायंकाळी तपासकामी मगरपट्टा पोलिस चौकीत नेले होते. त्यावेळी त्याने पोलिसांना धक्का देवून पलायन केले आहे. प्रितम ओसवाल याच्याबाबत काही माहिती मिळाल्यास त्यांनी हडपसर पोलिसांशी साधावा असे आवाहन हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रविंद्र शेळके यांनी केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.