Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पेठ नाक्याजवळ गोवा बनावटीची दारू जप्त, ३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त थरारक पाठलाग करत इस्लामपूर पोलिसांची कारवाई

पेठ नाक्याजवळ गोवा बनावटीची दारू जप्त, ३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
थरारक पाठलाग करत इस्लामपूर पोलिसांची कारवाईसांगली : खरा पंचनामा

पेठ नाका-शिराळा रस्त्यावर पोलिसांनी थरारक पाठलाग करत गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दारूचे बॉक्स, एक कार, तीन मोबाईल असा ३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली. 

आकाश शिवशरण तलवार (वय २०), समीर अमीर खानजादे (वय २५, दोघेही रा. साखराळे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर पोलिसांची चाहूल लागताच दिलीप विकास मोरे (रा. साखराळे) हा संशयित पसार झाला. गणेशोत्सव, ईदच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर पोलिसांनी रात्रगस्त वाढवली आहे. सोमवारी रात्री इस्लामपूर पोलिसांचे एक पथक पेठ नाका परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एक मारूती कार तेथून वेगाने शिराळ्याच्या दिशेने निघून गेली. 

पथकाला याचा संशय आल्याने पथकाने कारचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर पेठ-रेठरे धरण रस्त्यावर पोलिसांनी ती कार अडवली. त्यावेळी कारमधील दिलीप मोरे पसार झाला. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स सापडले. त्यानंतर तलवार आणि खानजादे यांना अटक करण्यात आली. तर दारू आणि कार (एमएच १० सीएक्स ४४८६), तीन मोबाईल असा ३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, दीपक ठोंबरे, सजन पाटील, जमीर मुलाणी, अलमगी लतीफ, सतीश खोत, अभिजित पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.