Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'त्या' दरोडेखोरांकडून चार गुन्हे उघड दोन लाखांचा मुद्देमाल जप्त विटा पोलिसांची कारवाई

'त्या' दरोडेखोरांकडून चार गुन्हे उघड दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
विटा पोलिसांची कारवाईसांगली : खरा पंचनामा

खानापूर तालुक्यातील भिवघाटकडे काहीजण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने येणाऱ्या सहाजणांच्या रेकॉर्डवरील टोळीला विटा पोलिसांनी दि. १८ सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून दोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. 

जितेंद्र भानुदास काळे (वय ३०, रा. मार्डी, सोलापूर), शिवाजी रामा काळे (वय २६, रा. जत), दादाराव लक्ष्मण पवार (वय ४२, रा. राणमासळे, सोलापूर), सुखदेव शिवाजी काळे (वय ३२, रा. मार्डी, सोलापूर), किरण शिवाजी काळे (वय २९, रा. मार्डी, सोलापूर), बालाजी माणिक पवार (वय २६, रा. मार्डी, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  

दि. १८ सप्टेंबर रोजी दरोडेखोरांची एक टोळी भिवघाटमार्गे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने येत असल्याची माहिती निरीक्षक डोके यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर त्यांनी मध्यरात्री विटा-भिवघाट रस्त्यावर या पथकांनी सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आलेली कार अडवली. कारमध्ये सहाजण होते. गाडीची तसेच त्यांची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये दरोड्यासाठी लागणारे साहित्य आढळले. त्यानंतर त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. 

सहाहीजणांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी विटा येथील तीन तर रेवणगाव येथील एक घर फोडून ऐवज लंपास केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून त्यातील दोन लाखांचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत चव्हाण, उपनिरीक्षक विशाल येळेकर, रोहिदास पवार, मोहन चव्हाण, उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, महेश देशमुख, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, विलास मोहिते, विकास जाधव, गणपत गावडे, प्रशांत जाधव, वैभव कोळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.