दुधारीच्या त्या तरूणाचा मृत्यू डीजेमुळे नाहीच!
सांगली : खरा पंचनामा
दुधारी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रवीण यशवंत शिरतोडे (रा. दुधारी) याचा मृत्यू डीजेमुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला क्षयरोगाचा त्रास होता. तसेच त्याने औषधोपचराकडे दुर्लक्ष केले होते. त्या दिवशी तो गाडी ढकलत आल्याने त्याला दम लागला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दुधारी येथील त्रिमूर्ती गणेश मंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत विना परवाना डीजे लावला होता. याप्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी मंडळाचे रमजान मुल्ला, उत्तम कुंभार, दीपक कांबळे, योगेश गोतपागर, संकेत पाटोळे, तानाजी शिरतोडे, सुशांत पाटोळे, विशाल बनसोडे, विनोद पाटोळे, महेश दळवी (सर्व रा. दुधारी), सूरज मुलाणी (रा. बलवडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या मंडळाने काढलेल्या विसजर्न मिरवणुकीत डीजे वाजवल्यामुळे प्रवीण शिरतोडे याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात होता. मात्र त्याला क्षयरोग होता. त्यातूनच त्याचा मृत्यू झाल्याचे मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू डीजेमुळे झाला नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.