Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणास 8 वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणास 8 वर्षे सक्तमजुरी



सांगली : खरा पंचनामा

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेडछाड काढणाऱ्याला तरुणाला जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एच. हातरोटे यांनी आठ वर्षे सक्तमजुरी आणि 8 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी युक्तीवाद केला. 

प्रवीण सुरेश सन्नके (२८, रा. मालगाव रोड, दत्त कॉलनी, मिरज) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. प्रवीण सन्नके हा पिडीत मुलीचा पाठलाग करून तु मला आवडतेस, असे म्हणून तिच्या भावाला ठार मारण्याची व स्वत: आत्महत्या करण्याची धमकी देत होता. वारंवार पाठलाग करून तिची छेडछाडही काढत होता. पिडीत मुलीच्या आईने याबाबत मिरज शहर पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी पोक्सोतर्गंत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

सहाय्यक निरीक्षक आय. एस. वर्धन यांनी या प्रकरणाचा तपास करून जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आरोपीला यापूर्वीही पोक्सोतर्गंत गुन्ह्यात दहा वर्षाची शिक्षा झाली होती. त्याच्यावर इतर गुन्हेही दाखल आहेत. त्यामुळे आरोपीला सहानभूती दाखवू नये, असा सरकारी वकीलानी युक्तीवाद केला. न्यायालयाने प्रविण याला दोषी धरून आठ वर्षे सक्तमजुरी व आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील सहा हजार रुपये पिडीत मुलीला देण्याचे आदेशही दिले. 

या खटल्यात मिरज पोलिस ठाण्याकडील शशिकांत पाटील, पैरवी कक्षातील सुनीता आवळे, रेखा खोत यांनी मदत केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.