देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का! मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदाराचा राजीनामा
बीड : खरा पंचनामा
राज्यभर मराठा आरक्षणाचा वणवा पेटू लागला आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. तर दुसरीकडे आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी प्रकृती अत्यवस्थ झाली आहे. मराठा आंदोलकांचा रोष मराठा नेत्यांवर व्यक्त होऊ लागल्याने मराठा सरपंच, आमदार, खासदारांनी राजीनामा देण्याचे सत्र सुरू केले आहे. आज भाजपाच्या एका आमदाराने राजीनामा दिला आहे. हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का मानला जात आहे.
टिकणारे आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मागितल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी सर ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. परंतु सरकारने विश्वासघात करत ४० दिवसानंतर आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला यामुळे जरांगे यांच्यासह संपूर्ण मराठा समाज संतापला आहे. आता गावोगावी साखळी उपोषण आणि राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात असल्याने वातावरण तणावाचे होत चालले आहे.
बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. या मराठा आरक्षणासाठी माझा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.