Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुरुंदवाडमधील खून प्रकरणी 9 जणाना अटक इचलकरंजी, विट्यातील संशयित : कुरुंदवाड पोलिसांची 24 तासात कारवाई

कुरुंदवाडमधील खून प्रकरणी 9 जणाना अटक
इचलकरंजी, विट्यातील संशयित : कुरुंदवाड पोलिसांची 24 तासात कारवाई



कुरुंदवाड : खरा पंचनामा

कुरुंदवाड-नृसिंहवाड़ी रस्त्यावरील शेतात एकाचा रविवारी सायंकाळी खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी कुरुंदवाड येथील 2, इचलकरंजी येथील 1 तर विटा (जि. सांगली) येथील 6 जणाना अटक केली आहे. तर एका अल्पवयिन मुलाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कुरुंदवाडचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली.

राहुल किरण भंबिरे, पवन नागेश कित्तूरे (दोघेही रा. कुरुंदवाड), शाहजान अलाबक्ष पठान (रा. इचलकरंजी), सागर अरविंद पवार, अनिकेत दत्तात्रय ढवणे, तुषार तुकाराम भारंबल, रोहन किरण जावीर, दिनेश विकास खरात, रोहन माणिक ठोकळे (सर्व रा. विटा, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

रविवारी सायंकाळी सुनील चव्हाण (वय 56) नृसिंहवाड़ी रस्त्यावरील शेतात वैरन आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी काहिनी धारदार शस्त्राने त्यांच्या हात, पाय, चेहऱ्यावर वार करून खून केला होता. घटनेची माहिती मिळताच करुंदवाड पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. गोपनीय माहिती तसेच सीसीटीवी फुटेजद्वारे काही नावे निष्पन्न झाली. त्यानंतर मुख्य संशयित राहुल भंबिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याच्याकडे कसुन चौकशी केल्यानंतर त्याने पूर्वी झालेल्या वादाच्या रागातुन मित्रांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर अन्य संशयितना विटा पोलिसांच्या मदतीने विटा येथून ताब्यात घेतले. सर्व संशयितना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कुरुंदवाडचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर पवार, अनिल चव्हाण, विवेक कराडे, ज्ञानदेव सानप, शहाजी फोडे, बाळासाहेब कोळी, संतोष साबळे, अरुण नागरगोजे, राजेंद्र सानप, सागर खाडे आदिनी ही कारवाई केली.

तो वार ठरला कारणीभूत
राहुल भंबिरे आणि मृत सुनील चव्हाण यांच्यात पूर्वी वाद झाला होता. त्यावेळी चव्हाण याने राहुलच्या गळ्यावर वार केला होता. त्याचा व्रण आजही त्याच्या गळ्यावर आहे. त्याकडे पाहुन राहुलला राग येत होता. त्या रागातुन त्याने मित्रांच्या मदतीने चव्हाण याचा काटा काढल्याचे पोलिसांनी सांगितले.

जेलमध्ये झाली होती ओळख
राहुल आणि विटा येथील संशयित यांची जेलमध्ये ओळख झाली होती. विटा येथील काही संशयितवर खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. तर विटा येथील 4 जणाना हद्दपार करण्यात आले आहे. ते इचलकरंजी येथे रहात होते. त्यातून राहुल आणि ते संपर्क साधत होते. त्यानीच चव्हाण याचे हात, पाय तोडण्याचा कट रचला होता. मात्र अति रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.