Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिंदे - फडणवीस तातडीनं दिल्लीसाठी रवाना!

शिंदे - फडणवीस तातडीनं दिल्लीसाठी रवाना!मुंबई : खरा पंचनामा

दसरा मेळाव्यानंतर आज (दि. २५) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. काही वेळेपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले. अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेमक्या कुठल्या कारणासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत, हे कळू शकलेलं नाही. पण मराठा आरक्षणासंदर्भात चर्चेसाठी हा दौरा होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान, काल सरकारला दिलेली शेवटची मुदत संपल्यानं मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा आंतरवली सराटी इथं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारनं वारंवार आश्वासनं देऊनही यंदा जरांगे आपल्या मागणीवर ठाम असल्यानं आता सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळं यावर केंद्र सरकारशी चर्चा करुन काही तोडगा काढता येतोय का? यासाठी त्यांनी दिल्लीकडे धाव घेतल्याचं बोललं जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.