Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आंचल दलाल साताऱ्याच्या अपर पोलिस अधीक्षक

आंचल दलाल साताऱ्याच्या अपर पोलिस अधीक्षक



सांगली : खरा पंचनामा

सांगलीच्या अपर पोलिस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांची साताऱ्याच्या अपर पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर साताऱ्याचे अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांची पिंपरी चिंचवडचे पोलिस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहे. 

सुमारे वर्षभरापुर्वी श्रीमती दलाल यांनी सांगलीच्या अपर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारला होता. गेले काही महीने त्या वैद्यकीय रजेवर होत्या. आता त्यांची बदली साताऱ्याच्या अपर पोलिस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्यांची बदली झाली असली तरी सांगलीच्या अपर पोलिस अधीक्षकपदी अद्यापही कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे लवकरच सांगलीला नवे अपर पोलिस अधीक्षक मिळतील अशी चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.