Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोलापूरमध्ये एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त

सोलापूरमध्ये एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त



सोलापूर : खरा पंचनामा

सोलापूरमध्ये एमडी ड्रग्ज बनविणाऱ्या फॅक्ट्रीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात 16 कोटींची ड्रग्जचा साठा न मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात कच्चा माल जप्त करण्यात आला आहे आणि तब्बल 8 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात आज सायंकाळीपर्यंत सविस्तर माहिती मिळणार असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबईपासून सोलापूरपर्यंत ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आल्याचे हे पहिले प्रकरण नाही. यापूर्वी 2016 साली अशाच पद्धतीने मोठा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. तेव्हा ठाणे गुन्हे शाखेकडून एव्हॉन नावाच्या कंपनीवर कारवाई करत दोन हजार कोटीचे ड्रग्ज पकडले होते. यानंतर रविवारी मुंबई गुन्हे शाखेचे युनिट नंबर 9 ने सोलापूरमध्ये कारवाई करत मोठा ड्रग्ज साठा जप्त केला आहे. पोलिसांने सोलापूरातील चिंचोळी एमआयडी परिसरात बंद पडलेली कंपनी एमडी ड्रग्ज बनवण्यात येत असल्याची माहिती होती. यानुसार मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने रविवार सायंकाळी छापेमारी करत कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.