Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत छोटा हत्ती-एसटीचा भीषण अपघात : चालक गंभीर जखमी

सांगलीत छोटा हत्ती-एसटीचा भीषण अपघात : चालक गंभीर जखमीसांगली : खरा पंचनामा

शहरातील आंबेडकर रस्त्यावर आज रात्री नऊच्या सुमारास छोटा हत्ती आणि एसटीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात छोटा हत्ती चालक गंभीर जखमी झाला आहे. 

रोहित लक्ष्मण म्हेत्रे (वय २१, रा. माधवनगर) असे जखमीचे नाव आहे. येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. रात्री उशीरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. माधवनगर येथील एका व्यापाऱ्याच्या छोटा हत्ती टेम्पोवर म्हेत्रे हा चालक म्हणून काम करत होता. रात्री उशीरा टेम्पो (एमएच १० सीआर ९४६४) इचलकरंजीहुन माल घेवून येत होता. येथील आंबेडकर रस्त्यावरून रात्री जात असताना समोरून छत्रपती संभाजीनगर डेपोची एसटी (एमएच ११ टी ९५७५) बसस्थानकच्या दिशेने निघाली होती. 

त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोची एसटीला समोरून जोरात धडक बसली. अपघात इतका भीषण होता की चालक रक्ताच्या धारोळ्यात पडला. बघ्यांची मोठी गर्दी झाली. लोकांनी तातडीने जखमी म्हेत्रे याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनीही घटनास्थळी पंचनामा केला. सांगली बसस्थानक प्रमुख शीतल माने यांच्यासह पथकानेही घटनास्थळी पाहणी केली. तसेच शासकीय रुग्णालयातही रुग्णांची विचारपूस केली. तसेच अपघात झालेल्या एसटीतील प्रवाशांची तातडीने सोय करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.