Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्नाटकात प्रसिध्द हॉटेलवर जीएसटी छापे! करोडोंची रोकड जप्त; महाराष्ट्रातही काही बडी हॉटेल्स, बडे केटरर्स रडारवर

कर्नाटकात प्रसिध्द हॉटेलवर जीएसटी छापे!
करोडोंची रोकड जप्त; महाराष्ट्रातही काही बडी हॉटेल्स, बडे केटरर्स रडारवरबंगलुरु : खरा पंचनामा

जीएसटी कर अधिकाऱ्यांनी सोमवारी कर्नाटकातील होस्कोटे येथील प्रसिद्ध मांसाहारी हॉटेल्सवर छापे टाकले आणि UPI पेमेंट मोडचा वापर करून मोठ्या प्रमाणात जीएसटी चोरी उघडकीस आणली. दरम्यान महाराष्ट्रातही काही बडी हॉटेल्स , बडे केटरर्स रडारवर आहेत असे समजते.

एका माहिती आधारे, दक्षता विभागातील अधिकाऱ्यांच्या सोमवारी छापे टाकण्यापूर्वी या बिर्याणी साठी प्रसिध्द हॉटेलात डमी ग्राहक माध्यमातून खरेदी करून, सर्वेक्षणे  करून नंतर  50 अधिकार्‍यांच्या पथकाने मुख्यतः बिर्याणीची दुकाने चालवणार्‍या या हॉटेल व्यावसायिकांच्या व्यावसायिक परिसर आणि निवासस्थानांची झडती घेतली. शहराच्या सीमेवर असलेले होकसोटे हे बिर्याणीच्या अनेक दुकानांसाठी ओळखले जाते, जिथे पहाटेपासूनच रांगाच्या रांगा आणि दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते.

सूत्रांकडून प्राप्त माहितनुसार, यातील मोडस ऑपरेंडी नुसार असंख्य UPI खाती वापरून आणि अशी UPI खाती सतत बदलून पेमेंट घेतले जात होते ज्यामुळे वास्तविक उलाढाल दडपून कर चुकवले जात होते. यामध्ये सहभागी हॉटेलवाले खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यासाठी चलन, विक्रीची बिले जारी करत नव्हते किंवा हिशोबाची योग्य पुस्तके ठेवत नव्हते.

एका प्रकरणात, एका मालकाच्या निवासस्थानाच्या झडतीदरम्यान 1.47 कोटी रोख रकमेसह 30 भिन्न QR कोड सापडले. या नंतर आयकर अधिकाऱ्यांना अलर्ट करण्यात आले, व ते पण छाप्यात सहभागी झाले आणि त्यांनी कारवाई सुरू केली.
 
गेल्या आठवड्यात कर अधिकाऱ्यांनी चिकपेटे येथे ही अशीच एक कारवाई केली आणि बड्या हॉटेल कडून मोठ्या करचोरी उघडकीस आणल्याचं समोर आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.