Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

म्हैसाळ येथे तलवारी घेऊन फिरणाऱ्यास अटक मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई

म्हैसाळ येथे तलवारी घेऊन फिरणाऱ्यास अटक
मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

म्हैसाळ (ता. मिरज) येथे धारदार तीन तलवारी घेऊन फिरणाऱ्या एकास अटक करण्यात आली. त्याच्याकडून तीन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. मिरज ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. 

सागर बापू आवळे (वय ३३, रा. विजयनगर, म्हैसाळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिले होते. त्यानुसार पथक म्हैसाळ परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी तेथील एका मोहननगर येथील एका बंद पडलेल्या पेट्रोल पंपाजवळ एकजण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे आढळून आले. त्याचा संशय आल्याने त्याला पथकाने ताब्यात घेतले.  

त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळील पोत्यात तीन तलवारी सापडल्या. त्यानंतर त्या जप्त करून त्याला अटक करण्यात आली.  पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बळीराम पवार, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, सचिन मोरे, संदेश धेडे, सुनंदा लोहार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.