Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत साडेचार लाखांच्या बनावट नोटा जप्त विश्रामबाग पोलिसांची कारवाई; तिघे संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील

सांगलीत साडेचार लाखांच्या बनावट नोटा जप्त
विश्रामबाग पोलिसांची कारवाई; तिघे संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील



सांगली : खरा पंचनामा

शहरातील विश्रामबाग येथील कल्पद्रूम क्रीडांगणाजवळ तिघाना अटक करून साडेचार लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या सर्व  नोटा बनावट असून कोल्हापूर जिल्ह्यातील तिघा संशयिताना अटक करण्यात आली आहे. विश्रामबाग पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ही करवाई केली.

वाहीद रफिक पठाण (वय २३, रा. यादव नगर, जयसिंगपूर), जमीर शौकत बागवान (वय ३८, इरगोंडा पाटील नगर, कबनुर, इचलकरंजी) आणि संतोष श्रीकांत हत्ताळे (३२, संगमनगर, तारदाळ, हातकणंगले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या नोटा कोठून आणल्या, कोठे तयार केल्या याची पोलिस माहिती घेत आहेत.

बनावट नोटा बाळगणाऱ्यांची माहिती घेवून त्यांच्यावर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिले आहेत. त्यानुसार विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गस्तीवर होते. त्यावेळी कल्पद्रूम क्रीडांगणाजवळ तिघेजण संशयास्पद रित्या आढळून आले. त्या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी झडती घेतली असता सॅकमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल असल्याचे दिसून आले. 

पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्या पाचशेच्या नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तब्बल चार लाख ३८ हजार ५०० रूपयांच्या नोटा बनावट असल्याचे दिसून आले. त्यांनी त्या नोटा कोठून आणल्या, कोठे तयार केल्या याची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान, तिघांनाही न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्या नोटा बाजारपेठेत खपवण्यासाठी आनल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. सहायक निरीक्षक पल्लवी यादव अधिक तपास करत आहेत.

अटक करण्यात आलेले तिघेही संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. यापुर्वीही बनावट नोटांचा कारखानाच सांगली पोलिसांनी उध्वस्त केला होता. त्यानंतर अनेकदा बनावट नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. अनेकदा कोल्हापूर कनेक्शन समोर आले आहे. याप्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.