Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माजी पोलीस आयुक्तांनी अजित पवार यांच्यावर केला गंभीर आरोप!

माजी पोलीस आयुक्तांनी अजित पवार यांच्यावर केला गंभीर आरोप!



पुणे : खरा पंचनामा

अजित पवार यांना नुकतेच  पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. परंतु आता अजित पवार अडचणीत येणार आहेत. विरोधक किंवा शरद पवार गटामुळे नाही तर माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलेल्या दाव्यामुळे अजित पवार यांच्यासमोर अडचण वाढणार आहे. अजित पवार यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप त्यांनी 'मॅडम कमिशनर' पुस्तकातून केला आहे.

पुणे पोलीस आयुक्तपदी मीरा बोरवणकर असतानाचे हे प्रकरण आहे. 2010 मधील या प्रकरणाचा उल्लेख मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकातून केला आहे. हे पुस्तक रविवारपासून बाजारात येत आहे. या पुस्तकात अजित पवार यांचे नाव न घेता गंभीर आरोप करण्यात आला आहे. येरवडा येथे पोलिसांची असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरवर दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अजित पवार यांचे थेट नाव घेतले नाही. परंतु जिल्ह्याचे मंत्री 'दादा' असे त्यात म्हटले आहे. या तीन एकर जागेवर पोलिसांची कार्यालय येणार होती, असा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे.

येरवडा येथील पोलिसांची सरकारी जागा खासगी व्यक्तीला दिली तर आपल्या प्रतिमेस धक्का बसेल, असे म्हणत आपण या व्यवहारला विरोध केला होता. परंतु माझे ऐकले गेले नाही आणि विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्ण करण्यात आला, असा आरोप मीरा बोरवणकर यांनी केला आहे. पुस्तकाच्या माध्यमातून हा खुलासा मीरा बोरवणकर यांनी केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.