Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तुरुंगात कैद्यांना ड्रग्ज पुरवणारा पोलीस हवालदार अटकेत

तुरुंगात कैद्यांना ड्रग्ज पुरवणारा पोलीस हवालदार अटकेतमुंबई : खरा पंचनामा

मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगातील पोलीस हवालदार विवेक नाईक याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात विवेक नाईक हा कैद्यांना ड्रग्ज पुरवत असे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून ७० ग्रॅम चरस जप्त करण्यात आलं. पोलिसांनी विवेक नाईक विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

आर्थर रोड कारागृहाच्या चेकिंग गेटमधून विवेक नाईकला अटक करण्यात आली आहे. त्याने चरसच्या कॅप्सूल अंतर्वस्त्रात लपवल्याचं आढळून आलं. नाईककडून आठ कॅप्सुल जप्त करण्यात आल्या आहेत. राहुल या नावाच्या कैद्याने त्याला या कॅप्सूल दिल्या होत्या विवेक नाईक आरोपी रशिदला या कॅप्सुल्स देणार होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. नाईकने चौकशी करणाऱ्या पोलीस हवालदाराला जखमी केलं आणि पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्य गेटवर त्याला अडवण्यात आलं.

पोलीस हवालदार विवेक नाईकला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आरोपी नाईक हा आर्थर रोड कारागृहातील एका कैद्याला अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे आता पोलीस अधिकारीच कारागृहात ड्रग्जची तस्करी करत असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी काय कडक कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.