Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत डोक्यात गॅस स्टोव्ह घालून तरूणाचा निर्घृण खून! संजयनगरमधील घटना

सांगलीत डोक्यात गॅस स्टोव्ह घालून तरूणाचा निर्घृण खून!
संजयनगरमधील घटना



सांगली : खरा पंचनामा

शहरातील संजयनगर येथील झेंडा चौकात एका तरुणाचा डोक्यात गॅस स्टोव्ह घालून निर्घृणपणे खून करण्यात आला. चार परप्रान्तीयनी है खून केल्याचे समजते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. 

नितीन आनंदराव शिंदे (वय ३२) असे खून झालेल्याचे नाव आहे. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री उशीरापर्यंत पंचनामा सुरू होता. 

नितीन शिंदे संजयनगर येथील खेराडकर पेट्रोलपंपाजवळील झेंडा चौकात राहण्यास आहे. त्याची मालवाहतूक गाडी असून तो व्यवसाय करतो. नितीनच्या वडिलांची वखार आहे. नितीन कामवरून परतल्यानंतर रविवारी सांयकाळी घराबाहेर पडला होता. त्यावेळी त्याची एका परप्रांतीयाच्या घराजवळ तो आला होता. त्या चौकात संशयित आले. 

त्यांच्यात किरकोळ कारणातून वादावादी झाली. त्यानंतर अर्धा तासाने नितीन हा घरात गेला. त्यावेळी संशयित पुन्हा दुचाकीवरून आले. त्यानंतर पुन्हा वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर संशयितांनी तेथील गॅस स्टोव्ह उचलून नितीनच्या डोक्यात घातला. एकच वर्मी घाव बसल्याने नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. अतिरक्तस्त्राव झाल्याने नितीनचा जागीच मृत्यू झाला. 

हा खून किरकोळ कारणातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अद्याप ठोस कारण समजू शकले नाही. खूनाची माहिती समजताच पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरिक्षक सुरज बिजली, विनोद साळुंखे, संतोष पुजारी, कपिल साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्री. जाधव यांनी तपासाच्या सूचना दिल्या. घटनास्थळी पंचनामा करून हा मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवला.

दरम्यान, नितीन शिंदे याचा खून त्याच्या राहत्या घरापासून अवघ्या दोनशे फुटाच्या अंतरावर झाला आहे. पण हा खून कोणत्या कारणातून झाला हे कारण मात्र समोर आले नाही. सांयकाळी त्याची चौघांबरोबर वादावादी झाल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले.

संजयनगर पोलिसांनी तपास चक्रे फिरवत तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी चौघेजण दुचाकीवरून त्याठिकाणी आल्याचे एका सीसीटीव्हीत स्पष्ट झाले. रात्री उशीरा संशयितांचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली होती.

खुनाच्या घटनेनंतर सांगली श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले. परिसरातील काही अंतरावरच श्‍वान घुटमळे. घटनास्थळावर पडलेला गॅस स्टोव्हवरील हाताचे ठसे, घरातील हाताचे ठसे, रक्ताचे नमुनेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.