Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साताऱ्यात वकिलांची बाईक रॅली

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साताऱ्यात वकिलांची बाईक रॅलीसातारा : खरा पंचनामा

मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने सातारा शहरात उत्स्फूर्तपणे बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये ५०० पेक्षा अधिक वकील सहभागी झाले होते ही रॅली सातारा जिल्हा न्यायालयाच्या आवारापासून ते राजवाडा तेथून पुन्हा कर्मवीर पथ मार्गे सातारा जिल्हाधिकारी कार्यालय अशी काढण्यात आली.

सातारा जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिवसेंदिवस वेगवेगळ्या संघटनांचा वाढता पाठिंबा आहे मग बुधवारी सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने काढण्यात आलेल्या जोरदार प्रतिसाद मिळाला या रॅलीमध्ये सातारा शहरातील ५०० वकील सहभागी झाले होते सकाळी साडेअकरा वाजता आलेला सातारा जिल्हा न्यायालयाच्या आवारातून सुरुवात झाली तेथून वकील रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालय तेथून पोवई नाका येथे आली येथे शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राजपथावरून रॅली गोलबागेला वळसा घालून मोती चौक, पाचशे एक पाटी पोलीस मुख्यालय मार्गे पोवई नाका आणि तिथून जिल्हाधिकारी कार्यालय अशी मार्गस्थ झाली.

वकिलांच्या शिष्टमंडळाने मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही सध्याच्या परिस्थितीची गरज आहे त्या दृष्टीने संपूर्ण सातारा जिल्हा बारा असोसिएशन आपल्या पाठीमागे ठामपणे उभे आहे असे थेट आश्वासन वकीलबार असोसिएशनच्या वतीने समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.