Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त चिंचाळकर यांच्याकडे पुण्याचा अतिरिक्त कार्यभार पुण्यातील अंमली पदार्थ तस्करी, विक्रीला चाप लागणार

कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त चिंचाळकर यांच्याकडे पुण्याचा अतिरिक्त कार्यभार
पुण्यातील अंमली पदार्थ तस्करी, विक्रीला चाप लागणार मुंबई : खरा पंचनामा

राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्याकडे पुणे विभागीय उपायुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. राज्य शासनाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या सहीने बुधवारी याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. चिंचाळकर यांच्या नियुक्तीमुळे पुण्यातील अंमली पदार्थ तस्करी, विक्रीला चाप लागणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून चिंचाळकर यांची ओळख आहे. 

श्री. चिंचाळकर यांची एक वर्षापूर्वी कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे कोल्हापूरसह पुण्याचाही अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. चिंचाळकर यांनी यापूवीर् पुणे जिल्ह्याचे अधीक्षक म्हणूनही काम पाहीले आहे. चिंचाळकर यांनी कोल्हापूर येथील कार्यभार घेतल्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील दारूच्या तस्करीवर चांगलाच वचक निमार्ण केला आहे. त्याशिवाय गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीवरही कडक कारवाई करण्यात आली आहे. 

पुण्यातील ससून रूग्णालयातून ड्रग तस्कर ललित पाटील याच्या पलायनानंतर अनेक नेत्यांनी राज्य उत्पादन शुल्कच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. मात्र चिंचाळकर यांच्यासारख्या कर्तव्यकठोर अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे पुण्यातील या ड्रग तस्करीचा पर्दाफाश होईल अशी चर्चा आहे. शिवाय ड्रग तस्करांना आळा घालण्यात त्यांना यश येईल असेही बोलले जात आहे. चिंचाळकर यांच्या पुणे विभागीय उपायुक्त पदी नियुक्तीमुळे पुण्यातील ड्रग तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.