Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कायद्यातील बदलांनंतर गुह्यांच्या कलमांतही बदल; कलम 420 नाही आता 316, 302 ऐवजी 101

कायद्यातील बदलांनंतर गुह्यांच्या कलमांतही बदल; कलम 420 नाही आता 316, 302 ऐवजी 101नवी दिल्ली : खरा पंचनामा

केंद्र सरकारने नवीन तीन फौजदारी कायदे आणले आहेत. या नव्या कायद्यामुळे आता गुह्यांतील कलमांतही बदल झाला आहे. भारतीय न्याय (द्वितीय) संहिता 2023, नगारिक सुरक्षा (द्वितीय) संहिता 2023, भारतीय साक्ष संहिता 2023 (द्वितीय) हे तीन नवीन कायदे राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायद्यात रूपांतर झाले आहे. परंतु, यात काही नवीन बदलही झाले आहेत.

भारतीय दंड संहितेत 511 कलमे होती. परंतु, आता भारतीय दंड न्याय संहितेत केवळ 358 कलमे राहिली आहेत. दंड प्रक्रिया संहिता म्हणजेच सीआरपीसीची जागा आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिताने घेतली आहे. सीआरपीसीच्या 484 कलमांच्या बदल्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत 531 कलमे आहेत. हत्येसाठी सर्रासपणे 302 कलम बोलले जायचे. परंतुत, आता 302 ऐवजी 101 हे कलम आहे. तसेच कोणाची फसवणूक केल्यास त्याला 420 म्हटले जायचे. परंतु, यातही बदल झाला असून आता फसवणुकीसाठी 316 हे कलम आहे. जमावबंदीसाठी प्रसिद्ध असलेले कलम 144 मध्येही बदल झाला आहे. जमावबंदीसाठी आता 189 हे कलम लागू होणार आहे.

या महत्त्वाच्या गुन्हे कलमात झाला बदल
गुन्हा आयपीसी भारतीय न्याय संहिता देशद्रोह कलम 124 कलम 152. जमावबंदी कलम 144 कलम 189. हत्या कलम 302 कलम 101. हत्येचा प्रयत्न कलम 307 कलम 109. दुष्कर्म कलम 376 कलम 63. मानहानी कलम 399 कलम 356. फसवणूक कलम 420 कलम 316.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.