Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीसालाच लावला चुना! चोरट्याने घरात घुसून पिस्तुलासह चोरली ३० काडतूसं

पोलीसालाच लावला चुना! 
चोरट्याने घरात घुसून पिस्तुलासह चोरली ३० काडतूसंनागपूर : खरा पंचनामा

नागपुरात चोरट्यांनी थेट पोलिसांची बंदूक आणि गोळ्याच चोरल्या असून पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातून पिस्टल आणि 30 जिवंत काढतूस चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात राज्य राखीव पोलीस दलाच्या कमांडंटच्या गनमॅनचे बंदुकीच्या 30 गोळ्यासह पिस्टल चोरीला गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही चोरी पोलीस वसाहतीतील घरात घुसून करण्यात आली आहे.

राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस जवान मंगेश लांजेवार जवानांच्या वसाहतीत राहतात. लांजेवार हे एस.आर.पी.एफ. गट क्र. 4 च्या समादेशक प्रियंका नारनवरे यांच्या गनमॅन पदी कार्यरत आहेत.

मंगेश लांजेवार त्यांचे पिस्टल आणि 30 जिवंत काडतूस घरी ठेवून, साप्ताहिक सुटी असल्याने भंडारा येथे गेले होते. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून आलमारीचे कुलूप तोडून घरातील पिस्टल आणि 30 जिवंत काडतूस चोरून नेले.

मंगेश हे नागपूरला परतआल्यावर घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलले आणि पिस्तूल आणि काडतुसे गायब असल्याचे दिसले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.