Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जामीन मिळवून देण्यासाठी २० हजारांची लाच घेणाऱ्या वकिलावर एसीबीकडून गुन्हा दाखल

जामीन मिळवून देण्यासाठी २० हजारांची लाच घेणाऱ्या वकिलावर एसीबीकडून गुन्हा दाखलपुणे : खरा पंचनामा

गुन्ह्यात अटक झालेल्या मुलाला लवकर जामीन मिळवून देतो, पोलीस अधिकाऱ्याला द्यावे लागतील असे सांगत २० हजारांची लाच मागणाऱ्या वकिलावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

शिवम गजानन नायकोडी (वय ३०, रा. जुन्नर) असे या वकिलाचे नाव आहे. तक्रारदार हे ७० वर्षांचे आहेत. त्यांच्या मुलाला खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात जुन्नर पोलिसांनी अटक केली आहे. शिवम नायकोडी हे त्यांचे वकिल होते. मुलाला लवकर जामीन मिळवून देतो, असे तक्रारदारांना सांगितले. त्यासाठी तपास अधिकाऱ्याला २५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली. त्याची ९ डिसेंबर रोजी पडताळणी केली असता वकिलाने तपासी अधिकाऱ्याला २० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून तक्रारदाराकडे पंचासमक्ष २० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. 

वकिलाने लाच मागितली तरी त्यात तपासी अधिकाऱ्याचा सहभाग आढळून आला नाही. लाच मागितल्याने तक्रारदार यांनी तक्रार केली होती. त्याची पडताळणीही झाली. मात्र, कारवाई दरम्यान तक्रारदार यांचे १७ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यामुळे सापळा कारवाई होऊ शकली नाही. परंतु, लाच मागितली गेली असल्याने गुन्हा दाखल नोंद केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.