Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईतील बंदरात DRI ने पकडली करोडोंची सिगारेट

मुंबईतील बंदरात DRI ने पकडली करोडोंची सिगारेटमुंबई : खरा पंचनामा

महसूल गुप्तचर संचालनालयाने चपळाईने तस्करी होणारी सिगारेटची मोठी खेप पकडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने जवाहरलाल नेहरू बंदरात लाखोंच्या सिगारेट जप्त केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत ५ कोटींहून अधिक आहे. डीआरआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तस्करांनी अतिशय हुशारीने हि सिगारेट लपवली होती.

त्यांनी सांगितले की, तस्करांनी चतुराईने सिगारेटची पाकिटे चिंचेच्या पुठ्याच्या बॉक्समध्ये लपवून ठेवली होती. सिगारेटची पाकिटे चिंचेच्या पेट्यांच्या आत ठेवल्या होत्या आणि चतुराईने सर्व बाजूंनी चिंचेने झाकल्या होत्या जेणेकरून पुठ्याचे बॉक्स उघडल्यावरही सिगारेटच्या पेट्या सापडू नयेत. तस्करीच्या मालामध्ये 33,92,000 सिगारेट्सचा समावेश आहे, ज्याचे बाजार मूल्य अंदाजे 5.77 कोटी रुपये इतके आहे.

याप्रमाणेच याआधी मागिल काही दिवसांपूर्वी २१ डिसेंबर रोजी बँकॉकहून येणाऱ्या एका प्रवाशाला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी एअरपोर्टवर रोखले. प्रवाशाच्या सामानाची तपासणी करण्यात आली. सामानाच्या तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना बिस्किट आणि केकच्या पाकिटाच्या आत नऊ बॉल अजगर आणि दोन कॉर्न साप सापडले. अधिकाऱ्यांनी जेंव्हा या दोन सापांना पाहिले तेंव्हा ते चक्रावून गेले. हे सर्व साप विदेशी प्रजातींचे होते. त्यांना तस्करीसाठी आणण्यात आले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.