Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सराईत दुचाकी चोरट्याला अटक, ३ गाड्या जप्त विश्रामबाग पोलिसांची कारवाई

सराईत दुचाकी चोरट्याला अटक, ३ गाड्या जप्त
विश्रामबाग पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगलीसह मिरजेतून दुचाकी चोरणाऱ्या सराईतास अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विश्रामबागचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली. 

निखील प्रकाश दबडे (वय २५, रा. उदगाव वेस, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दुचाकी चोरट्यांना पकडून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना निरीक्षक श्री. मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी पथकाला एक तरूण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी धामणी रस्ता परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. 

पथकाने धामणी रस्ता परिसरात सापळा रचला होता. संशयित दबडे तेथे आल्यानंतर पथकाने संशयावरून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर सुरुवातील त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने सांगली, मिरजेतून तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्या तीनही गाड्या जप्त करून त्याला अटक करण्यात आली. 

सांगलीचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अफरोज पठाण, अनिल ऐनापुरे, संदीप साळुंखे, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, संकेत कानडे, शिवाजी ठोकळ, गजानन चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.