Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

युतीमधील एक-एक घटकपक्ष संपणार अन्...

युतीमधील एक-एक घटकपक्ष संपणार अन्...



मुंबई : खरा पंचनामा

अजित पवार शिंदे सरकारमध्ये जात उपमुख्यमंत्री झाले. या सगळ्या गोष्टी आठवण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेलं विधान... जयंत पाटील यांनी महायुती- भाजप आणि मित्रपक्षांबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे.

आधी युपीए सरकारच्या काळात जरी मनमोहन सिंग हे पंतप्रधान असले तरी मित्रपक्षांच्या म्हणण्याला अर्थ असायला. घटक पक्षाने मांडलेली भूमिका मंत्रिमंडळाच्या बैठकीत लक्षात घेतली जायची. आज मात्र तसं दिसत नाही. महायुतीतील इतर पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे. भाजपसोबत असलेल्यांना संपवतो. शिवसेनेचे तेच झाले. आता जे सोबत आहे, त्यांना भाजपमध्ये विलीन करायला सांगतील. शिवसेनेच्या बाबतीत तेच झालं. शिवसेना ऐकत नाही, म्हणून त्यांचे उमेदवार पाडले गेले, असं जयंत पाटील म्हणाले.

आधी युपीए सरकार असायचे, एनडीएचं सरकार असायचं आता मोदी सरकार आहे. आता इतर मंत्र्यांचे अधिकारच नाही. लोकांना कोण मंत्री आहेत तेच माहिती नाही. भाजप म्हणतंय येत्या निवडणुकीत आम्ही 400 पेक्षा जागांवर जिंकू, असं झाल्यास इतर पक्षच ते शिल्लक ठेवणार नाही आणि भाजपचा डोमिनंन्स वाढेल, असं जयंत पाटील म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.