Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

15 राज्यांतील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश

15 राज्यांतील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर
महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश



नवी दिल्ली : खरा पंचनामा

१५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सोमवारी केली.

१३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी तर २ राज्यांतील उर्वरित ६ सदस्यांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत.

यात महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. कॉंग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण, भाजपचे प्रकाश जावडेकर, शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई, भाजपचे व्ही. मुरलीधर आणि नारायण राणे यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत येत्या 2 एप्रिल 2024 रोजी संपत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.