Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न



कोल्हापूर : खरा पंचनामा

गावगुंडांनी घर पाडले, असा आरोप करत एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी कुटुंबातील एकाने हातात तेलाचा डब्बा घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

पोलिसांनी तत्काळ या सर्वांना ताब्यात घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू असतानाच हा प्रकार झाल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली.

सागर पुजारी (रा. कसबा सांगाव, ता. कागल) असे या व्यक्तीचे नाव आहे. तो जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हातात तेलाचा डब्बा घेऊन कुटुंबासह आला होता. त्याच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोही होता. कसबा सांगाव येथे गावगुंडांनी घर पाडले, असा आरोप करत तहसीलदार आणि मंडल अधिकाऱ्यांनी सुद्धा आमच्यावर अन्याय केल्याचा त्यांने गंभीर आरोप केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.