Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोरेगाव भीमामध्ये शौर्य दिनाचा उत्साह, अभिवादनासाठी लाखो अनुयायांची गर्दी

कोरेगाव भीमामध्ये शौर्य दिनाचा उत्साह, अभिवादनासाठी लाखो अनुयायांची गर्दी



पुणे : खरा पंचनामा

पुण्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी आज (1 जानेवरी) 206 वा शौर्य दिनाचा उत्साह यला मिळत आहे. शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीम येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आलेल्या अनुयायांनी मोठी गर्दी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी विजय स्तंभाला अभिवादन केले. चंद्रकातं पाटील, जितेंद्र आव्हाड, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले हे नेतेही कोरेगाव भीमा या ठिकाणी येणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1 जानेवारी 1927 ला विजय स्तंभास भेट दिली होती. या शौर्य दिनानिमित्त विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो अनुयायी आज येणार आहेत. विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळते. 206 वर्षांपुर्वी कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाईमध्ये महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. 1 जानेवारी 1927 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हा पासून कोरेगाव भीमा या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यासा सुरूवात झाली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.