Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्य उत्पादन शुल्कच्या ३ अधीक्षक, ११ उपअधीक्षकांच्या बदल्या साताऱ्याच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांची रत्नागिरीला बदली

राज्य उत्पादन शुल्कच्या ३ अधीक्षक, ११ उपअधीक्षकांच्या बदल्या
साताऱ्याच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांची रत्नागिरीला बदली  मुंबई : खरा पंचनामा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्ककडील ३ अधीक्षक आणि ११ उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. साताऱ्याच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांची रत्नागिरीच्या अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाचे उप सचिव रविंद्र औटे यांच्या सहीने बुधवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.  

धुळ्याचे अधीक्षक मनोज शेवरे यांची सिंधुदुर्ग येथे तर वर्ध्याच्या अधीक्षक स्वाती काकडे यांची धुळ्याच्या अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या उपअधीक्षकांची नावे कंसात कोठून कोठे बदली : उत्तमराव शिंदे (बाॅम्बे ब्रेव्हरीज रायगड ते हडपसर पुणे), वैभव वैद्य (रत्नागिरी ते ठाणे अधीक्षक कार्यालय), सुरजकुमार रामोड (मुंबई उपनगर ते बाॅम्बे ब्रेव्हरीज रायगड), सी. पी. हांडे (ठाणे ते पालघर), हर्षवर्धन शिंदे (नाशिक ते रत्नागिरी), सुजित पाटील (प्रवरानगर, अहमदनगर ते पिंपरी चिंचवड), जितेंद्र गोगावले (अहमदनगर ते मुंबई उपनगर ३), युवराज शिंदे (पिंपरी चिंचवड ते कोल्हापूर), संजय पाटील (हडपसर, पुणे ते सोलापूर), राजाराम खोत (कोल्हापूर ते अहमदनगर), ए. डी. देशमुख (छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर).

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.