Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायकसह २३ अधिकारी बनले वरिष्ठ पोलिस निरीक्षक

एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायकसह २३ अधिकारी बनले वरिष्ठ पोलिस निरीक्षकमुंबई : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्यांना बढत्या व नवीन जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. यात एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्यासह २३ अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बनले आहेत.

गुन्हे शाखेत कार्यरत असलेले दया नायक यांच्यासह सुधीर दळवी, पंढरीनाथ पाटील यांना बढती देत गुन्हे शाखेत, आर्थिक गुन्हे शाखेतील प्रकाश बागल, जगदीश कुलकर्णी, दीपक दळवी यांना आर्थिक गुन्हे शाखेत, नागपाडा पोलिस ठाण्याचे सचिन कदम यांना बढती देऊन आर्थिक गुन्हे शाखेत, तर आर्थिक गुन्हे शाखेतील अजय जोशी यांना मुलुंड पोलिस ठाण्यात नियुक्ती दिली आहे. दिंडोशी पोलिस ठाण्याचे वपोनि जीवन खरात यांची संरक्षण आणि सुरक्षा विभागात, संजीव तावडे यांची वाहतूक विभाग, नितीन पोतदार यांची अंमलबजावणी कक्ष, मुलुंड ठाण्याचे कांतिलाल कोथिंबिरे यांची पूर्व नियंत्रण कक्षात बदली केली आहे. गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक मोहिनी लोखंडे यांची व्ही. पी. रोड ठाण्यात बदली झाली.

विमानतळ ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भागवत गरांडे यांना अॅन्टॉपहील, तर भायखळा ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती झाली असून, भायखळा ठाण्यातील मंजूषा परब यांना बढती देऊन भायखळा पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपविली आहे. सशस्त्र पोलिस दलातील मधुकर सानप (विमानतळ पोलिस ठाणे), कांदिवली पोलिस ठाण्याचे संदीप विश्वासराव (कफ परेड पोलिस ठाणे) तर कांदिवली पोलिस ठाण्याची जबाबदारी गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे सांभाळणार आहेत, तर कफ परेड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मच्छिंद्र यांच्याकडे डी. एन. नगर पोलिस ठाण्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.