Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चोरीसाठी थेट विमान प्रवास! दिल्लीत जाऊन चोरायचे आलीशान गाड्या सांगलीतील पोलिस कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक

चोरीसाठी थेट विमान प्रवास! दिल्लीत जाऊन चोरायचे आलीशान गाड्या
सांगलीतील पोलिस कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक



पिंपरी-चिंचवड : खरा पंचनामा

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी गाड्या चोरण्यासाठी विमानातून दिल्लीला जायचे. तसेच तेथून आलीशान गाड्या चोरून त्या राज्यात आणून बनावट कागद पत्रांनी विकायचे.

या टोळीची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली असून यात सांगली जिल्ह्यातील एका पोलिसाचा देखील समावेश आहे. त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ५७ लाख रुपयांच्या ११ गाड्या देखील जप्त केल्या आहेत.

अजीम सलीम पठाण, शशीकांत प्रताष काकडे, राजराम उर्फ राजू तुकाराम खेडेकर, महेश भीमाशंकर सासवे, प्रशांत माने, विकास माने, भरत खोडकर, हाफिज, इलियास आणि रसूल शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहे. यातील आरोपी भरत खोडकर हा सांगली जिल्ह्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. तो चोरलेल्या गाड्या विकण्यासाठी मदत करत होता.

आरोपी अजीम सलीम पठाण हा त्याचा साथीदार शशिकांत काकडे याच्या सोबत विमानाने दिल्लीला जात होता. येथे तो त्याच्या सहकाऱ्यासह आलीशान गाड्या चोरायचे. ही वाहने ती राज्यात आणून बनावट कागदपत्रे तयार करून विकत होते. दरम्यान, चाकणमध्ये एक वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस या चोरीचा तपास करत होते. तेव्हा त्यांना या टोळीची माहिती मिळाली. त्यांनी अजीम सलीम पठाण याला अटक केली.

त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने त्याचा साथीदार शशिकांत काकडे याचे नाव सांगितते. तसेच दोघेही बाहेरील राज्यात जाऊन आलीशान गाड्या चोरत असल्याचे त्यांनी सांगितले. यात त्यांना त्यांचे इतर साथीदार मदत करायचे. यात पोलिस शिपाई देखील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दहापैकी ४ जणांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.