Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जिल्ह्यातील तब्बल ४२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; १९ सहायक निरीक्षक, २० उपनिरीक्षकांचा समावेश विट्याचे निरीक्षक डोके यांची जिविशाकडे, शहरचे निरीक्षक देशमुख यांची मानव संसाधनकडे तर अरूण सुगावकर यांची मिरज शहरचे प्रभारी म्हणून बदली

जिल्ह्यातील तब्बल ४२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; १९ सहायक निरीक्षक, २० उपनिरीक्षकांचा समावेश 
विट्याचे निरीक्षक डोके यांची जिविशाकडे, शहरचे निरीक्षक देशमुख यांची मानव संसाधनकडे तर अरूण सुगावकर यांची मिरज शहरचे प्रभारी म्हणून बदली



सांगली : खरा पंचनामा

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ४२ पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात तसेच उपविभागात ३ वर्षे सेवा पूर्ण झालेले तसेच मूळ याच जिल्हयातील असलेल्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. विट्याचे निरीक्षक संतोष डोके यांची जिविशाकडे, सांगली शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख यांची मानव संसाधनकडे तर गुप्तावार्ताचे निरीक्षक अरूण सुगावकर यांची मिरज शहरचे प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्यांमध्ये १९ सहायक निरीक्षक, २० उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली यांनी शनिवारी दिले आहेत.

बदली झालेले सहायक निरीक्षकांची नावे कंसात कोठून कोठे बदली झालेले ठिकाण : बजरंग झेंडे (तासगाव ते वाहतूक शाखा विटा), मनमित राऊत (आष्टा ते वाहतूक शाखा इस्लामपूर), नितीन केराम (तासगाव ते वाचक उपअधीक्षक, मिरज), आण्णासो बाबर (आष्टा ते आर्थिक गुन्हे शाखा), गजानन कांबळे (जिविशा ते सांगली ग्रामीण), पल्लवी यादव (विश्रामबाग ते गुप्तवार्ता), जयश्री वाघमोडे (वाहतूक शाखा विटा ते विटा), विनोद कांबळे (कवठेमहांकाळ ते आटपाडी), समीर ढोरे (सांगली शहर ते तासगाव), प्रियांका बाबर (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभाग ते सांगली ग्रामीण), दत्तात्रय कोळेकर (आटपाडी ते कवठेमहांकाळ), अनिल जाधव (विटा ते प्रभारी अधिकारी चिंचणी वांगी), जयदीप कळेकर (वाहतूक शाखा इस्लामपूर ते आष्टा), भालचंद्र देशमुख (वाचक, उपअधीक्षक ते प्रभारी कासेगाव), जयसिंग पाटील (शिराळा ते प्रभारी कुरळप), गणेश वाघमोडे (कुरळप ते दहशतवादविरोधी पथक), प्रफुल्ल कदम (सांगली ग्रामीण ते जिविशा), प्रदीप शिंदे (एटीएस ते आष्टा), सागर गोडे (कवठेमहांकाळ ते सांगली शहर).

बदली झालेले उपनिरीक्षकांची नावे कंसात कोठून कोठे बदली झालेले ठिकाण : जगन्नाथ पवार (कवठेमहांकाळ ते वाचक उपअधीक्षक जत), सुरेखा सूर्यवंशी (कवठेमहांकाळ ते एलसीबी), आप्पासाहेब पडळकर (आटपाडी ते पैरवी अधिकारी), स्मिता पाटील (सांगली ग्रामीण ते अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा), दीपाली पवार (कडेगाव ते मुख्यालय), विजय पाटील (कुरळप ते मुख्यालय), सागर पाटील (मिरज शहर ते मुख्यालय), दीपक सदामते (संजयनगर ते मुख्यालय), राजू अन्नछत्रे (महात्मा गांधी चौक ते तासगाव), दीपक माने (सांगली शहर ते मिरज ग्रामीण), श्रीकांत वासुदेव (मिरज शहर ते इस्लामपूर), प्रमोद खाडे (महात्मा गांधी चौक ते सांगली शहर), संदीप गुरव (तासगाव ते महात्मा गांधी चौक, मिरज), सागर गायकवाड (विटा ते इस्लामपूर), रूपाली गायकवाड (सांगली शहर ते महात्मा गांधी चौक), केशव रणदिवे (मिरज ग्रामीण ते सांगली शहर), जयश्री कांबळे (इस्लामपूर ते विटा), निलम जाधव (इस्लामपूर ते मिरज शहर), अफरोज पठाण (विश्रामबाग ते जिवीशा), मनिषा नारायणकर (जत ते आर्थिक गुन्हे शाखा).

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.