Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चोरी, घरफोडी करणाऱ्या तीन आंतरराज्य सराईतांना अटक १४.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

चोरी, घरफोडी करणाऱ्या तीन आंतरराज्य सराईतांना अटक
१४.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

शहरातील नेमीनाथनगर येथील प्रख्यात धन्वंतरीचा बंगला फोडणाऱ्या तीन आंतरराज्य सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक आलिशान कार, सोन्या-चांदीचे दागिने असा १४.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

अंजुम इब्राहिम शेख (वय ४१, रा. राबोडी), रमेश महादेव कुंभार (वय ४३, रा. भिवंडी), रफीक मेहबूब शेख (वय ४०, रा. राबोळी, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सांगलीतील प्रसिद्ध धन्वंतरी वैभव माने यांचा नेमीनाथनगर येथील ओम गोविंद बंगला फोडून दागिने लंपास केल्याची घटना दि. १८ डिसेंबर रोजी उघडकीस आला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक निरीक्षक शिंदे यांनी तयार केले होते. यातील संशयितांचा शोध घेत असताना उपनिरीक्षक कुमार पाटील, विक्रम खोत यांना ही चोरी ठाण्यातील त्या तीन संशयितांनी केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.  

पथक त्यांचा शोध घेत असताना तीनही संशयित नवी मुंबई येथे असल्याचीही माहिती मिळाली. पथकाने तांत्रिक तपास करत मुंब्रा ते नवी मुंबई रस्त्यावरील सुखदेव धाबा येथे तीनही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक आलिशान कार, कटावणी, जॅक, सोन्या-चांदीचे दागिने असा १४.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तीनही चोरटे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर ठाणे, पुणे, सातारा जिल्ह्यासह कर्नाटकातही चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, सागर लवटे, विक्रम खोत, बिरोबा नरळे, नागेश खरात, संदीप गुरव, उदयसिंह माळी, संदीप नलवडे, अमर नरळे, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.