Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नूतन एसपी संदीप घुगे यांत्रिकी अभियंता! २०१५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी

नूतन एसपी संदीप घुगे यांत्रिकी अभियंता!
२०१५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारीसांगली : खरा पंचनामा

सांगलीच्या नूतन पोलिस अधीक्षकपदी आयपीएस अधिकारी संदीप घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली असून त्यांनी यापूर्वी रायगड, उस्मानाबाद, मालेगाव, नवी मुंबई, अकोला येथे विविध पदावर काम केले आहे. लवकरच ते सांगलीच्या अधीक्षक पदाची सूत्रे स्विकारणार आहेत.  

श्री. घुगे यांनी २०१५ ते २०१७ या कालावधीत मसुरी (उत्तराखंड) आणि हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेतले आहे. २०१७ मध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यात परिविक्षाधीन सहायक अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. २०१७ ते २०१९ या काळात उस्मानाबाद येथे सहायक अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. २०१९ ते २०२० या काळात नाशिक ग्रामीणच्या मालेगावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी कतर्व्य पार पाडले आहे. २०२० ते २०२२ या काळात नवी मुंबई येथे एसआरपीएफ येथेही त्यांनी सेवा बजावली आहे. २०२२ ते २०२४ या काळात त्यांनी अकोल्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. 

या सेवा काळात त्यांनी गुन्ह्यांचा तपास गतीने करण्यात सहकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केलेच शिवाय कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यातही त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या कार्यकालात झालेल्या विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांनी यशस्वीपणे हाताळल्या आहेत. मालेगावसारख्या संवेदनशील शहरात जातीय सलोखा राखण्यात त्यांना यश आलेच शिवाय कोविड १९ काळातही त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. पोलिस अधिकारी, कर्मचार्यांसाठी कल्याणकारी उपक्रमही त्यांनी राबवले आहेत. सांगलीतही उठावदार कामगिरी करू असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.