Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली जिल्ह्यातील ६ पोलिस ठाण्यांना मिळाले नवीन प्रभारी सुरज बिजली जतला तर प्रकाश गायकवाड यांची कडेगावला नियुक्ती

सांगली जिल्ह्यातील ६ पोलिस ठाण्यांना मिळाले नवीन प्रभारी
सुरज बिजली जतला तर प्रकाश गायकवाड यांची कडेगावला नियुक्ती



सांगली : खरा पंचनामा

सांगली जिल्ह्यातील सहा पोलिस ठाण्यांना नवीन प्रभारी अधिकाऱ्याांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजयनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी सुरज बिजली यांची जतचे प्रभारी म्हणून तर जिल्ह्यात नव्याने आलेले प्रकाश गायकवाड यांची कडेगाव ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी रात्री पोलिस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत.

निरीक्षक संदीप भागवत यांची सायबर पोलिस ठाणे, ईश्वर ओमासे यांची विश्रामबाग पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जयसिंगपूर येथून बदली होऊन आलेले निरीक्षक संदीप कोळेकर यांची कवठेमहांकाळचे प्रभारी म्हणून तर विनय बहिर यांची आटपाडीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भैरू तळेकर यांची मिरज ग्रामीणच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांची तासगाव पोलिस ठाण्याकडे तर तासगावकडील सहायक निरीक्षक समीर ढोरे यांची विनंतीवरून मिरज शहर पोलिस ठाण्याकडे बदली करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अरविंद बोडके, सिद्धेश्वर जंगम यांची बदलीची विनंती अमान्य करण्यात आली आहे. 

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.