Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही'

'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही'ठाणे : खरा पंचनामा

राज्यात लागू करण्यात आलेले ६२ टक्के आरक्षण सोडून इतर आरक्षणात मराठा समाजाला सामावून घ्यावे, अशी भूमिका मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायद्यापेक्षा कोणी मोठा नसून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मुलायजमा ठेवला जाणार नाही, असा इशारा नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळावा आज कल्याण - मुरबाड रोडवरील वरप या गावी घेण्यात आला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर नामोउल्लेख टाळून टीका केली. मराठा आरक्षण प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. मात्र इतर आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेऊन घेतला जाईल. सध्या ६२ टक्के आरक्षण आहे. ओबीसी, एस. टी, एस. सी. सह ५२ टक्के आरक्षण असून १० टक्के आरक्षण हे आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे. हे आरक्षण सोडून इतर आरक्षणात मराठा समाजाला सामावून घ्यावे, असे सांगताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, काही जण टोकाची भूमिका घेत आहेत. मुंबईत येण्याची भाषा करीत आहेत. डॉ. आंबेडकर यांच्या घटनेनुसार देश चालत आहे, कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल, त्याचा मुलायजमा ठेवला जाणार नाही. कुणीही कायद्यापेक्षा मोठा नसल्याच त्यांनी म्हटलं आहे. हा एकप्रकारे जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.