Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत खुनातील संशयित बेडीसह पळाला

सांगलीत खुनातील संशयित बेडीसह पळाला




सांगली : खरा पंचनामा

खुनातील संशयित वैद्यकीय तपासणीनंतर जिल्हा कारागृहात जाण्यापूर्वी आवारातून बेड्यासह पळाला. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली असून त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहे.

लक्ष्मण आण्णा चौगुले (रा. विटा) असे पलायन केलेल्याचे नाव आहे. २०१८ मध्ये झालेल्या एका खुनात लक्ष्मण चौगुले हा संशयित आहे. जिल्हा कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत होता. गेल्या काही दिवसापासून त्याला लघवीचा त्रास सुरू होता. तसेच पाय देखील लुळे पडत होते. त्यामुळे सांगलीत सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. तेथून त्याला कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये उपचारास पाठवले होते. तेथे तो दोन-तीन दिवस दाखल होता. त्यानंतर त्याला पुण्यातील ससून रूग्णालयात उपचारास पाठवण्याची शिफारस केली होती.

लक्ष्मण याला शनिवारी सकाळी पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी ससूनला नेले होते. तेथे उपचार केल्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास त्याला घेऊन पोलिस सांगलीत आले. जिल्हा कारागृहात त्याला सोडण्यापूर्वी अंधाराचा फायदा घेऊन लक्ष्मण बेड्यासह पळाला. त्यामुळे पोलिसांची पळापळ झाली. परंतू अवघ्या काही मिनिटात लक्ष्मण अंधारात पसार झाला होता. पोलिसांनी रात्रभर शोध मोहिम राबवली. परंतू तो हाती लागला नाही. त्याचा शोध सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.