Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील ३३ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या ८ उपनिरीक्षकांचाही समावेश, एका उपनिरीक्षकास पदोन्नती

राज्यातील ३३ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
८ उपनिरीक्षकांचाही समावेश, एका उपनिरीक्षकास पदोन्नती



मुंबई : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर राज्यातील ३३ सहायक पोलिस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. तर ८ उपनिरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. एका पोलिस उपनिरीक्षकाची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. अपर पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांच्या सहीने बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत.  

बदली झालेल्या सहायक निरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे बदली चेतन ढेकणे (मुंबई शहर ते गडचिरोली परिक्षेत्र), भोजलिंग दोडमिसे (लोहमार्ग, मुंबई ते पुणे शहर), दिपाली खरात (लोहमार्ग नागपूर ते मुंबई शहर), भारत साळुंखे (मुंबई शहर ते कोल्हापूर परिक्षेत्र), श्वेता घोरपडे (बदली आदेशाधीन ते पिंपरी चिंचवड), योगेश देशमुख (मुंबई शहर ते नवी मुंबई), राजेश गडवे (नागपूर शहर ते औरंगाबाद परिक्षेत्र), रूपचंद शेले (मुंबई शहर ते ठाणे शहर), जीवन माने (बदली आदेशाधीन ते कोकण परिक्षेत्र), गोकुळ ठाकूर (मुंबई शहर ते औरंगाबाद परिक्षेत्र), विशाल मुळे (चंद्रपूर ते कोल्हापूर परिक्षेत्र), अजय गोरड (बदली आदेशाधीन ते नाशिक परिक्षेत्र), रमेश हत्तीगोटे (चंद्रपूर ते पिंपरी चिंचवड), अविनाश गडाख (बदली आदेशाधीन ते औरंगाबाद परिक्षेत्र), निलेश मोरे (मुंबई शहर ते नाशिक परिक्षेत्र), विशाल पाटील (मुंबई शहर ते नाशिक परिक्षेत्र), सुधाकर चव्हाण (पीटीसी जालना ते नांदेड परिक्षेत्र), सचिन नावडकर (मुंबई शहर ते सीआयडी), महेश मखले (वाशिम ते ठाणे शहर), हषार्राणी देवरे (मुंबई शहर ते सीआयडी), श्रीदेवी पाटील (बदली आदेशाधीन ते अमरावती परिक्षेत्र), भाऊसाहेब गोसावी (बीड ते कोल्हापूर परिक्षेत्र), प्रियंका पाटकर (बदली आदेशाधीन ते अमरावती परिक्षेत्र), आबासाहेब पाटील (बदली आदेशाधीन ते सीआयडी), राणी काळे (बदली आदेशाधीन ते सीआयडी), हेमराज साठे (लोहमार्ग मुंबई ते नवी मुंबई), अनिल बागूल (मुंबई शहर ते नाशिक परिक्षेत्र), विद्या रणेर (मुंबई शहर ते पीटीसी जालना), अशोक जायभये (बुलढाणा ते नांदेड परिक्षेत्र), शिल्पा निमकर (बदली आदेशाधीन ते पुणे शहर), मंगेश भांगे (मुंबई शहर ते ठाणे शहर), प्रवीण स्वामी (रायगड ते पिंपरी चिंचवड), अनिता पवार (मुंबई शहर ते कोल्हापूर परिक्षेत्र).

बदली झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे बदली एम. जी. नाईकवाडे (नागपूर शहर ते औरंगाबाद परिक्षेत्र), स्वप्नाली जंगले (मुंबई शहर ते औरंगाबाद शहर), नितीन नलवडे (वर्धा ते औरंगाबाद परिक्षेत्र), राहुल भदाणे (नंदूरबार ते नवी मुंबई), मो. साजीद हुसेन (रायगड ते नांदेड परिक्षेत्र), विष्णू टोणे (मुंबई शहर ते नवी मुंबई), मयुरेश साळुंखे (मुंबई शहर ते पिंपरी चिंचवड), सीमा बेंद्रे (नागपूर ग्रामीण ते नांदेड परिक्षेत्र). पदोन्नतीने उपनिरीक्षक शुभांगी कुटे यांची सीआयडीकडे बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.