Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतोय, पण...

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतोय, पण...



मुंबई : खरा पंचनामा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर आज 27 जानेवारी रोजी मराठा आंदोलक वाशीतूनच मागे परतले. आंदोलकांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांचे आभार मानले. दरम्यान आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं सरकारने मान्य जरी केले असले तरी ज्यांनी नेत्यांची घरं जाळली. ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे मागे घेतल्या जात नसल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबईतील वाशीतून मराठा आंदोलन मागे घेतल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधाला. ते म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे की, आंदोलन मागे घेतलं. आज अतिशय चांगला मार्ग निघून आंदोलनाची सांगता झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा प्रश्न सुटला आहे. सोबतच मनोज जरांगे पाटील यांचेसुद्धा अभिनंदन करतो. त्यांचेही आभार मानतो की, त्यांनी परत जाण्याचा मार्ग स्वीकारला. कारण आम्ही आधीपासूनच सांगत होतो की, आरक्षण देण्याचा मार्ग हा कायद्याने काढावा लागेल. कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरसकट करता येत नाही, परंतु जे रक्तानात्यातील आहेत. त्यांना ते देता येईल. त्या संदर्भात संविधानात देखील तरतूद असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातून या अडचणी दूर करण्यात आल्या. यामुळे मराठा समाजाचा एका मोठा प्रश्न सुटणार आहे. तर ओबीसी बांधवांमध्ये भीती होती की, त्यांच्यावर अन्याय होईल. परंतु तसे काही केले नाही. कारण, मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होईल याची दक्षता घेण्यात आली आहे अशी राज्य सरकारची भूमिका आहे.

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेत आहोत. पोलिसांना ज्यांनी मारलं, किंवा ज्यांनी कुणाचे घर जाळले असतील अशांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. त्याबाबत ना कुणी मागणी केली ना तसा कुठलाही निर्णय झाला. गुन्हे मागे घेण्याचा आदेश आम्ही दिले आहेत. मग ते आंतरवाली सराटीती असो की मग संप्रूण महाराष्ट्रातील. मात्र, घरं जाळण्याची गुन्हे असतील, किंवा मग ज्यांनी पोलिसांवर थेट हल्ला केला असेल, डायरेक्ट आग लावली आहेत. बसेस जाळल्या असतील अशांवरील गुन्हे मागे घेता येत नाहीत. याबाबत कोर्टाचेच आदेश आहेत. कोर्टाच्या आदेशाशिवाय असे गुन्हे मागे घेतल्या जात नाहीत. उर्वरित जे गुन्हे आहेत ते आम्ही परत घेतो अशीही माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.