Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आयकर विभागाने खासदार भावना गवळींचे बँक खाते गोठवले!

आयकर विभागाने खासदार भावना गवळींचे बँक खाते गोठवले!अकोला : खरा पंचनामा

कर चुकवल्याप्रकरणी यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या 'महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण'चे बँक खाते आयकर विभागाच्या वतीने गोठवण्यात आले आहेत. 8 कोटी 26 लाखांचा आयकर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. कलम 226 (3) अंतर्गत आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. तर, कर चुकवोगिरीप्रकरणी आयकर विभागानं महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि संचालकांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

मागच्या आठवड्यात आयकर विभागाने खासदार भावना गवळी यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर खासदार गवळींनी दोन दिवसांपूर्वी अकोला आयकर कार्यालयात आपल्या सीएच्या माध्यमातून कागदपत्रे सादर केली होती. मात्र, आयकर विभागाचं समाधान न झाल्यानं खाते सील करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे 'महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण' या संस्थेनं 2013 ते 2016 मध्ये आयकर चुकवल्याचा आरोप असून, त्यामुळेच ही कारवाई करण्यात येत आहे. 

मात्र, खासदार गवळींनी संस्थेचे खाते सील झाल्याची बातमी फेटाळली. अशी कोणतीही माहिती आपल्यापर्यंत आली नसल्याची माहिती त्यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. संस्थेत काही लोकांनी 18 कोटींचा अपहार केल्याचा दावा गवळी यांनी केला आहे. तसेच, संस्थेच्या कार्यालयातून 7 कोटीची रक्कम गहाळ झाल्याची तक्रार देखील गवळी यांनी दिली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.