Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील क्रिकेट स्पर्धेत माधवनगरचा समर्थ किडस विजेता

सांगलीतील क्रिकेट स्पर्धेत माधवनगरचा समर्थ किडस विजेतासांगली : खरा पंचनामा

सांगलीतील मिकता क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या मिकता प्रिमियर टेनिस बॉल क्रिकेट लीग २०२४ स्पर्धेत माधवनगरचा समर्थ किडस संघ विजेता ठरला. विजेत्या संघाला मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. 

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे दि. १७ ते २१ जानेवारीदरम्यान या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत जाखापूर येथील स्व. पिंटुदादा पाटील स्पोर्ट्स संघाने द्वितीय, खंडेराजुरी येथील हॉटेल साई डिलक्सने तृतीय क्रमांक तर अग्रण धुळगाव येथील हॉटेल भन्नाट यारी संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. 

या स्पर्धेत वैभव भोसले यांना मॅन आफ द टूर्नामेंट, सुशील बर्ले यांना बेस्ट बॅटसमन, दिलीप शेनंगे यांना बेस्ट बॉलर तर साहिल मोमीन यांना बेस्ट फिल्डर किताबाने गौरवण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.