Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर परिक्षेत्रातील २८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या सांगलीतील ३, कोल्हापुरातील ९, सातारा ४, पुणे ग्रामीण ७, सोलापूर ग्रामीणकडील ५ जणांचा समावेश विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिले आदेश

कोल्हापूर परिक्षेत्रातील २८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
सांगलीतील ३, कोल्हापुरातील ९, सातारा ४, पुणे ग्रामीण ७, सोलापूर ग्रामीणकडील ५ जणांचा समावेश
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिले आदेशकोल्हापूर : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील २८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्यांमध्ये सांगलीतील ३, कोल्हापुरातील ९, साताऱ्यातील ४, पुणे ग्रामीणमधील ७, सोलापूर ग्रामीणमधील ५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी या बदल्यांचे आदेश दिले आहेत. 

सांगली जिल्ह्यातील सांगली ग्रामीणचे प्रभारी निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांची कोल्हापूर येथे, मिरज ग्रामीणचे प्रभारी नारायण देशमुख यांची पुणे ग्रामीणकडे, कडेगावचे प्रभारी जितेंद्र शहाणे यांची सातारा जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात नव्याने ७ अधिकारी येणार आहेत. कोल्हापूर येथे ७, साताऱ्यात ६, पुणे ग्रामीणकडे ६ तर सोलापूर ग्रामीणकडे २ अधिकारी नव्याने दाखल होणार आहेत.  

बदली झालेल्या अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे बदली झाल्याचे ठिकाण : संदीप कोळेकर (कोल्हापूर ते सांगली), राजेंद्र सावंत्रे (कोल्हापूर ते सातारा), अविनाश कवठेकर (कोल्हापूर ते सातारा), भैरू तळेकर (कोल्हापूर ते सांगली), राजेंद्र मस्के (कोल्हापूर ते सातारा), प्रकाश गायकवाड (कोल्हापूर ते सांगली), ईश्वर ओमासे (कोल्हापूर ते सांगली), अरविंद काळे (कोल्हापूर ते सातारा), संतोष घोळवे (कोल्हापूर ते पुणे ग्रामीण), संदीप भागवत (सातारा ते सांगली), नवनाथ मदने (सातारा ते पुणे ग्रामीण), निंगप्पा चौखंडे (सातारा ते कोल्हापूर), विलास भोसले (पुणे ग्रामीण ते कोल्हापूर), यशवंत नलावडे (पुणे ग्रामीण ते सातारा), संजय जगताप (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण).

सचिन पाटील (पुणे ग्रामीण ते कोल्हापूर), महेश ढवाण (पुणे ग्रामीण ते सांगली), नारायण पवार (पुणे ग्रामीण ते सोलापूर), दिलीप पवार (पुणे ग्रामीण ते कोल्हापूर), विनय बहिर (सोलापूर ग्रामीण ते सांगली), दिपरतन गायकवाड (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण), गोरख गायकवाड (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण), अशोक सायकर (सोलापूर ग्रामीण ते कोल्हापूर), अरूण फुगे (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण).

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.