Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

५ हजार विद्यार्थ्यांनी घेतली पोलिस ठाण्याच्या कार्यपध्दतीची माहिती रेझिंग डेनिमित्त इस्लामपूर पोलिसांचा उपक्रम

५ हजार विद्यार्थ्यांनी घेतली पोलिस ठाण्याच्या कार्यपध्दतीची माहिती
रेझिंग डेनिमित्त इस्लामपूर पोलिसांचा उपक्रम



सांगली : खरा पंचनामा


पोलिस ठाण्यातील दैनंदिन कामकाज कसे चालते, पोलिसांकडील विविध प्रकारची शस्त्रे, वाहतुकीचे नियम, मुलींच्या रक्षणाकरता असलेले कायदे, डायल 112 मधील कार्यप्रणाली याची सविस्तर माहिती तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांना देण्यात आली. इस्लामपूर शहरातील विविध शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतला. इस्लामपूर पोलिस ठाण्यामार्फत रेझिंड डे (पोलिस स्थापना दिवस) निमित्त या उक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली. 


शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत निरीक्षक हारूगडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्याथ्यार्ना सखोल माहिती दिली. यावेळी या विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्याचे रोजचे कामकाज, पोलिसांची कार्यपद्धती, पोलिस वापरत असलेल्या शस्त्रांविषयीची सखोल माहिती, वाहतुकीचे नियम, मुलींच्या रक्षणासाठी असलेले कायदे, डायल 112 मधील कार्यप्रणाली याविषयीही माहिती देण्यात आली. 

या उपक्रमात इस्लामपूर शहरातील कन्या कॉलेज इस्लामपूर, राजारामबापू मिलिटरी हायस्कूल, आर आय टी कॉलेज इस्लामपूर, यशवंतराव चव्हाण कॉलेज इस्लामपूर, आदर्श बालक मंदिर इस्लामपूर, इस्लामपूर हायस्कूल, मालती कन्या हायस्कूल, व्हीएस नेरलेकर हायस्कूल, विद्यामंदिर हायस्कूल, आदर्श बालक मंदिर या शाळेमधील अंदाजे पाच हजार विद्यार्थी, विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी सहभाग घेऊन माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची निरीक्षक हारूगडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तरे दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.