साथीदारानेच केला शरद मोहोळचा गेम!
पुणे : खरा पंचनामा
कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची पुण्यात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. दुपारी सव्वाएकच्या सुमारास शरद मोहोळ याच्यावर चार राऊंड फायर करण्यात आले, यानंतर तो जागेवरच कोसळला.
गोळीबार झाल्यानंतर मोहोळला सह्याद्री हॉस्पिटल कोथरुड आणि ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान शरद मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱ्याची माहिती समोर आली आहे. शरद मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेला साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी हल्ला केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोहोळ याच्यावरचा हल्ला त्याच्याच साथीदाराने केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
शरद मोहोळ हा मोहोळ टोळीचा म्होरक्या संदीप मोहोळचा सख्खा चुलत भाऊ होता. 2007 साली संदीप मोहोळचा गणेश मारणे टोळीने खून केला, यावेळी शरद मोहोळ संदीपची गाडी चालवत होता. भावाच्या हत्येनंतर शरद मोहोळने गणेश मारणे टोळी संपवण्याची शपथ घेतली. 2010 साली शरद मोहोळने गणेश मारणे टोळीचा म्होरक्या किशोर मारणेचा निलायम टॉकीजजवळ खून केला. लवळेगावचा सरपंचाचं किडनॅपिंग आणि रॉबरीमध्ये शरद मोहोळ प्रमुख आरोपी होता. 2012 साली जर्मन बेकरी ब्लास्टचा आरोपी महम्मद कातील सिद्दीकीची जेलमध्ये बर्मुडाच्या नाडीने गळा आवळून हत्या करण्यात आली, याचा आरोपही शरद मोहोळवर झाला. पण न्यायालयाने त्याची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.