Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शरद मोहोळ खून प्रकरणात पिस्तूल पुरविणारे दोघे अटकेत मुळशीत केला गोळीबाराचा सराव

शरद मोहोळ खून प्रकरणात पिस्तूल पुरविणारे दोघे अटकेत
मुळशीत केला गोळीबाराचा सराव



पुणे : खरा पंचनामा

काही दिवसांपूर्वी पुण्यात भरदिवसा कुख्यात गुंड शरद मोहोळ याची तीघांनी गोळीबार करत हत्या केली, या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. या हत्येनंतर पोलीसांना तत्काळ कारवाई करत आठ आरोपींना अटक देखील केली. यानंतर आता पुन्हा याप्रकरणी हत्येसाठी पिस्टल पुरवणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

धनंजय मारुती वटकर (वय २५, रा. कराड), सतीश संजय शेडगे (वय २८, रा. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. आरोपींना पिस्तुले कोणी पुरवली, याचा शोध घेण्यात येत होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार साहिल पोळेकर आणि साथीदारांना वटकर आणि शेडगे यांनी पिस्तुले पुरविल्याचे उघड झाले. त्यानंतर दोघांना गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली.

शरद मोहोळचा ५ जानेवारी भरदुपारी सुतारदरा येथील घरासमोर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. या आरोपींनी मुळशी तालुक्यात तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करण्याचा सराव केला होता. या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.