Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ठाकरेंच्या वांद्रे भागात एकनाथ शिंदेंचे बॅनर; पोस्टरवर शिंदेंचा 'शिवसेना पक्षप्रमुख' असा उल्लेख

ठाकरेंच्या वांद्रे भागात एकनाथ शिंदेंचे बॅनर; पोस्टरवर शिंदेंचा 'शिवसेना पक्षप्रमुख' असा उल्लेख



मुंबई : खरा पंचनामा

शिवसेना पक्ष कुणाचा? याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला. शिवाय उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा निर्णय नार्वेकर यांनी दिला.

त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. अशातच ठिकठिकाणी अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत. ठाकरे कुटुंबाचं मातोश्री हे निवासस्थान मुंबईतील वांद्रे भागात आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा होल्ड या भागात आहे. याच वांद्यात एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागलेत. बोरीवलीतही असेच बॅनर लागले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागत आहेत. मुंबईतील वांद्रे भागात शिंदेंचे अभिनंदन करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा 'शिवसेना पक्षप्रमुख' असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या विभाग प्रमुखांना बॅनर लावण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. यानंतरच्या सर्व बनर्सवर एकनाथ शिंदे यांचा 'शिवसेना पक्ष प्रमुख' असा उल्लेख करा, असे आदेश पक्ष कार्यालयातून देण्यात आले आहेत, अशी माहिती आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.