Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाबळेश्वर येथे तरुणीची गळफास घेवुन आत्महत्या

महाबळेश्वर येथे तरुणीची गळफास घेवुन आत्महत्यासंभाजी पुरीगोसावी 
सातारा : खरा पंचनामा

महाबळेश्वर येथे शनिवारी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जिजामाता हौसिंग सोसायटी मधील तरुणीने गलफास घेऊन आत्महत्या केली.

साक्षी प्रकाश कासुर्डे (वय १९) असे मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्यमुळे कुटुंबांनाच नव्हे तर पोलिसांना देखील धक्का बसला आहे. महाबळेश्वर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या देखील साक्षी कासुर्डे ही चांगलीच ओळखीत होती. पोलीस ठाण्याच्या बाजार पेठेतील एका दुकान दुकानात ती कामाला होती. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारांस उघडकीस आली. 

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन महाबळेश्वर शहरांपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर जिजामाता हौसिंग सोसायटीत साक्षी कासुर्डे ही राहत होती. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारांस घरी जेवण्यासाठी आली असता जेवण झाल्यानंतर तिने आपल्या खोलीत गळफास घेवुन आत्महत्या केली. हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनांस आल्यानंतर घरातील लोकांनी तिला महाबळेश्वर मधील ग्रामीण रुग्णालयात तातडीने  नेण्यात आले मात्र तिचा उपचारापूर्वींच मृत्यू झाला. तिने कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे अघाप समोर आले नाही. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार एस. एस. शेलार अधिक तपास करीत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.